नाशिक : वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची भर पावसात धिंड

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसापासून नाशिकरोड व परिसरात दुचाकी चारचाकी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहे .

एवढेच नाही तर त्यांची नाशिकरोड परिसरातून जाहीर धिंड काढून सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली गुन्हेगारांची भीती पोलिसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी व मंगळवारी असे सलग दोन दिवस विहितगाव आणि धोंगडे मळा येथील दुचाकी चारचाकी वाहनांची जाळपोळ करून गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींच्या वेळीच मुस्क्या आवळल्या आहेत.

तसेच नाशिकरोड परिसरातील धोंगडे नगर, राजलक्ष्मी मंगल कार्यालय, विहितगाव, देवळाली गाव आदी भागात गुन्हेगारांची धिंड काढली.
यामुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहे. याप्रसंगी उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त प्रशांत बछाव, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनगर विजय पगारे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, उपनिरीक्षक महाजन, पोलीस कर्मचारी विनोद लखन, गौरव गवळी, पंकज कर्पे, अनिल शिंदे, सुरज गवळी, राहुल जगताप, जयंत शिंदे, सौरभ लोंढे, सोमनाथ गुंड आदी उपस्थित होते..

The post नाशिक : वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची भर पावसात धिंड appeared first on पुढारी.