नाशिक : विना परवाना दारु विक्री करणारे ४ संशयित ताब्यात

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : अंबड पोलिसांनी सिडको, अंबड भागातील वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून अवैधरीत्या विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या चार संशयीताना ताब्यात घेतले. शिवाय त्यांच्याकडून ३६ हजार पाचशे रुपये किमतीची देशी दारू जप्त केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड एमआयडीसी हद्दीत अवैधपणे देशी दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून संशयित आरोपी सिकंदर फाजीमीया पठाण (वय ४३, रा दत्तनगर) , संजय भास्कर पवार (वय ३५, रा दत्तनगर अंबड ) विजय कचरू मोरे (वय ३९, रा. चुंचाळे गाव अंबड), सुनिता राजू अहिरे (वय ३५, रा घरकुल योजना अंबड नाशिक ) यांच्याकडून अवैधपणे विक्री करत असलेले ३६ हजार पाचशे रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात अंबड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश मुगले , उप निरीक्षक संदीप पवार, , श्रीशैल सवळी , समाधान चव्हाण, अनिल कुराडे, उदय देशमुख, किरण सोनवणे, जनार्दन ढाकणे, अमीर शेख यांच्या पथकाने केली.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : विना परवाना दारु विक्री करणारे ४ संशयित ताब्यात appeared first on पुढारी.