नाशिक : शिंदे एमआयडीसीत दोन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा : शिंदे औद्योगिक वसाहती मधील दोन कंपनीला रविवारी (दि. ५) सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान आग लागली. यात एक कोटिंग आणि दुसऱ्या केमिकल्स कंपनीचा समावेश आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

नाशिक रोड येथून आगीचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत आग सुरू होती. शिंदे औद्योगिक वसाहती मधील नायगाव रोडवर कडवा पाठाच्या जवळ एका केमिकल कंपनीला रात्री अचानक आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते. स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे मोठी वित्तहानी व जीवित आणि टळली. येथील सामाजिक कार्यकर्ते संजय तुंगार यांनी अग्निशामक दलाला तसेच नाशिक रोड पोलिसांना आगीच्या घटनेची माहिती कळवत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

The post नाशिक : शिंदे एमआयडीसीत दोन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली appeared first on पुढारी.