नाशिक : श्वानांचं लसीकरण करण्यासाठी लंडनहून आणलेल्या ट्रकमध्ये उभारलं रुग्णालय

लंडनच्या ट्रकमध्ये श्वानांचे लसीकर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिकमध्ये श्वानांच्या लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी खास लंडनहून आलेल्या चालत्या फिरत्या ट्रकमध्ये रुग्णालय उभारण्यात आले आहे. हा ट्रक शहरातील विविध ठिकाणी नेऊन पाळीव तसेच भटक्या श्वानांचे रेबीजचे लसीकरण करण्यात येत आहे. पुढील दीड महिना शहरात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

रेबिझ आजारचे प्रमाण आजही देशातील पाळीव तसेच भटक्या कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.  याच रेबिझचे समूळ उच्चाटन व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविला जातो आहे.  वर्ल्ड वेटीनरी सर्विस, मिशन रेबिझ आणि अ‍ॅनिमल वेल्फेयर अँड अँटी हॅरॅशमेंट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविला जात असून त्यासाठी संस्थेचा ट्रक हा लंडन येथून आलेला आहे.

लंडनहून आलेल्या या ट्रकची किंमत सात कोटी रुपये इतकी आहे. हा ट्रक सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण व अद्ययावत आहे. यामध्ये चालतं फिरंत रुग्णालय उभारण्यात आले असून यामध्ये एक्सरे मशीन, लॅब, कोल्ड स्टोरेज, ऑक्सीजन मशीन अश्या अनेक अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. आतापर्यंत शंभरहून अधिक श्वानांना लसीकरण करण्यात आले असून तीन श्वानांवर यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली आहे. संस्थेचे डॉक्टर व कर्मचारी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन रस्त्यातील भटकी कुत्रे पकडून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जात आहे. 

हेही वाचा : 

The post नाशिक : श्वानांचं लसीकरण करण्यासाठी लंडनहून आणलेल्या ट्रकमध्ये उभारलं रुग्णालय appeared first on पुढारी.