नाशिक : सहायक पोलिस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात

लाचखोरी पोलिस, www.pudhari.news

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या विजय नारायण शिंदे (51) या सहायक पोलीस उपनिरीक्षक , वर्ग 3, यास 3000 रुपये लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांच्या पत्नीने येवला तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या अदखलपात्र तक्रारीवरून कारवाई करण्यासाठी व तक्रारदार त्यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र तक्रार अर्जानुसार दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याचे मोबदल्यात 4000/- रुपये लाचेची मागणी करत त्यातील पहिला हप्ता रुपये 3,000/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना सहायक पोलिस उपनिरीक्षक यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सापळा अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, राजेश गिते, शरद हेंबाडे, अनिल राठोड यांनी नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि नरेंद्र पवार वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

The post नाशिक : सहायक पोलिस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात appeared first on पुढारी.