नाशिक : सातपूरला गोळीबारासह कोयत्याने हल्ला

सातपूर www.pudhari.news

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ जुन्या वादातून दोघा तरुणांवर गोळीबार व कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.१९) घडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.

रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तपन जाधव मित्रासह एम.एच ०४ ई एक्स ५६७८ या चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात आरोपी आशिष जाधवने दोन साथीदारांसह एम एच १५ डी एम ७६३९ या चारचाकीतून येत तपनच्या गाडीला महिंद्रा सोना या कंपनीजवळ जोरदार धडक दिली. यानंतर गाडीतून उतरत तपनवर कोयत्याने वार केले व गोळीबार केला. तिघांनी केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तपनच्या मित्राने आपले प्राण वाचवण्यासाठी कंपनीच्या आवारात पळ काढला. धडकेमुळे आरोपींची गाडी बंद पडल्याने त्यांनी मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार कामगाराला बंदूक अन् कोयत्याचा धाक दाखवत त्याची दुचाकी (एमएच १५ एफव्ही ७६५६) घेऊन आरोपींनी घटनस्थळावरून पळ काढला. संशयित आरोपीच्या गाडीमध्ये पोलिसांना कोयते आणि मिरची पावडर मिळून आली. या घटनेमुळे सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, सातपूर पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. घटनास्थळी उपायुक्त सोहिल शेख, विजय ढमाळ, खांडवी यांनी पाहणी केली.

हेही वाचा:

The post नाशिक : सातपूरला गोळीबारासह कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.