नाशिक : साहित्यकणा फाउंडेशनचे राज्यस्तरीय वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

पुरस्कारर्थी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साहित्यकणा फाउंडेशनतर्फे कविता, कथा, कादंबरी व बालसाहित्य या चार वाङ्मय प्रकारांतील साहित्यकृतींना देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

यंदाचा सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार मनीषा पाटील हरोलीकर (सांगली) यांच्या ‘नाती वांझ होताना’ तर नाशिकच्या तन्वी अमित यांच्या ‘आवर्ती अपूर्णांक’ या दोन कवितासंग्रहांस जाहीर झाला आहे. मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार प्रा. यशवंत माळी (सांगली) यांच्या ‘उलघाल’ व नाशिकच्या पुष्पा चोपडे ‘मन न्यारं रे तंतर’ या दोन कथासंग्रहास जाहीर झाला. शीलाताई गहिलोत – राजपूत कादंबरी पुरस्कार नीरजा (मुंबई) ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे, तर राहुल पाटील स्मृती बालसाहित्य पुरस्कार ‘सुरस धातू गाथा’ या साहित्यकृतीसाठी प्रा. डॉ. सुनील विभूते यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे साहित्यकणाचे अध्यक्ष संजय गोराडे यांनी जाहीर केले आहे. जाहीर पुरस्कारार्थींना संमेलनात रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रा. डॉ. सुरेश पाटील, प्रा. मनीषा डोंगरे, प्रा. भीमराज पगारे व किरण भावसार यांनी परीक्षणाचे काम पाहिले. रविवारी (दि. 12) कॅनडा कॉर्नर येथील समर्थ मंगल कार्यालयात ‘साहित्य कणा’चे नववे संमेलन होणार असल्याची माहिती सचिव विलास पंचभाई दिली.

कार्यक्रमाची रूपरेषा अशी…
साहित्यकणाच्या साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, तर अध्यक्षस्थानी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्वर्य पाटेकर असणार आहेत. आजचे साहित्य मूल्यहिन झाले आहे का? या विषयावर चर्चासत्र होणार असून, प्रा. दिलीप पवार, प्रा. प्रतिभा पवार, प्रवीण जोंधळे, मुलाखतकार राज शेळके हे चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या समारोपाप्रसंगी अध्यक्ष म्हणून विश्वास ठाकूर उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : साहित्यकणा फाउंडेशनचे राज्यस्तरीय वाङ्मयीन पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.