धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा, दोन गुन्हे दाखल

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर अखेर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

धुळ्यात महंमद पैगंबर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये एका गटाने आक्षेपार्ह घोषणा दिल्याने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले. यात भाजयुमोचे रोहित चांदोडे, नगरसेवक हिरामण गवळी, तसेच प्रभा परदेशी, हर्षल विभांडी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या समवेत चर्चा करून या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या संदर्भातील मोबाईल मध्ये काढलेल्या चित्रीकरणाची क्लिप देखील पोलीस प्रशासनाला सादर करण्यात आली. या प्रकरणात अखेर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यात अॅ़ड विशाल पिंपळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहम्मद साजिद फैजल अहमद, मोहम्मद अमीर मोहम्मद साबीर यांच्यासह आठ अनोळखी आणि मिरवणूक समितीच्या सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनीदेखील दिलेल्या फिर्यादीनुसार आवेश जमील मंसूरी, जमीरउद्दीन मोहम्मद. खलीद शहा आणि मिरवणूक आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत डीजे वाद्याचा अनधिकृत वापर करणे तसेच जमावात लांब काठ्यांना झेंडे लावून फिरवून लोकांच्या जीवित व वैयक्तिक सुरक्षिततेला धोका आणणे तसेच मालवाहू वाहनातून लोकांची वाहतूक करणे या संदर्भातील आरोप करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

The post धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा, दोन गुन्हे दाखल appeared first on पुढारी.