निवडणुकांपूर्वी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीसांची खबरदारी

पोलीस ठाणे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंभीर गुन्ह्यांमधील संशयित आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जामिनावर बाहेर आल्यास संबंधित गुन्हेगारांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार

लावण्याचे आदेश दिले आहेत. शहरात ५५२ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कारागृहांमधील गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठीही काही यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. हे गुन्हेगार जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा गुन्हेगारी कृत्य होऊ नये, यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिस दलातील कार्यपद्धतीनुसार पोलिस ठाणेनिहाय संशयितांच्या यादीनुसार व न्यायालयीन आदेशानुसार हजेरी लावावी लागते. त्यानुसार पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार करणाऱ्या आणि मध्यवर्ती कारागृहातून सध्या जामिनावर असलेल्या संशयितांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. न्यायालयीन आदेशानुसार तसेच इतर गुन्हेगारांनाही हजेरी लावण्याचे आदेश देण्यात येत आहे. नियमित हजेरीमुळे गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष राहात असून, त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होण्यास मदत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच पोलिस ठाण्यात वारंवार हजेरी लावावी लागत असल्याने गुन्हेगारांवर वचक राहात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस ठाणे : हजेरीसाठी येणारे गुन्हेगार याप्रमाणे…
भद्रकाली : ०५
अंबड : ०९
चुंचाळे एमआयडीसी : १०
सरकारवाडा : ११
इंदिरानगर : १२
गंगापूर : १३
आडगाव : १८
देवळाली कॅम्प : २४
सातपूर : २६
मुंबई नाका : ५०
पंचवटी : ५५
म्हसरूळ : ६१
उपनगर : ६१
नाशिकरोड : १९७

हेही वाचा:

The post निवडणुकांपूर्वी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीसांची खबरदारी appeared first on पुढारी.