पंतप्रधान मोदींच्या पत्नींचे जळगावात आगमन

पंतप्रधान मोदी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या तिर्थयात्रेला निघाल्या आहेत. शेगावकडे जाताना त्या जळगाव येथे थांबल्या. यावेळी त्यांनी जळगावातील ओंकारेश्वर मंदिरात भेट देऊन पूजन केले. यावेळी त्यांच्यासोबत बहिण, भाऊ, सेवक उपस्थित होते.

जशोदाबेन मोदी यांनी ओंकारेश्वर मंदिरात समुद्रजल, नर्मदाजल आणि गंगाजलाने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला. तसेच वटवृक्ष आणि तुळशीचे पूजन केले. ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे जुगलकिशोर जोशी, आशा जोशी यांनी त्यांचा सत्कार केला. पौरोहित्य आशिष पांडे, पंडित राघवेंद्र, प्रिन्स पांडेय यांनी केले. यावेळी गोटू जोशी, अक्षय जोशी, दिलीप जोशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा;

The post पंतप्रधान मोदींच्या पत्नींचे जळगावात आगमन appeared first on पुढारी.