पिंपळनेर : राजे छत्रपती मार्शल आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेत यश

पिंपळनेर - मार्शल आर्ट www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात नुकत्याच घेण्यात आलेल्या साक्री तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. राजेछत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या गायत्री अहिरे या विद्यार्थिनीने ३ कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुरेंद्र वसावे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या दोघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय व क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नूतन मराठा माध्यमिक विद्यालय छडवेल कोरडे येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत या दोन्ही विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. विजयी विद्यार्थ्यांचे, स्पर्धकांचे, संस्थेचे अध्यक्ष संभाजी अहिरराव, सचिव रा. ना. पाटील संचालक जगदीश ओझरकर, अनिल बागुल, शामशेठ कोठावदे, मुख्याध्यापिका सोनाली पाटील यांनी क्रीडा शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना संभाजीराव अहिरराव, अमोल अहिरे, पंकज ढवळे यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : राजे छत्रपती मार्शल आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेत यश appeared first on पुढारी.