पिंपळनेर : राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत तनुष्काचे यश

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
कर्म.आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तनुष्का महेश मराठे या विद्यार्थीनीने राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत 17-वर्ष वयोगटातील 52 किलो वजनगटात रौप्यपदक प्राप्त केले. तनुष्का ही इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथिल क्रीडाशिक्षक महेश मराठे यांची कन्या आहे. तिला संभाजी अहिरराव, अमोल अहिरे यांने मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडाशिक्षक एच.के.चौरे, व्ही.एन.दहिते यांचे सहकार्य मिळाले. संस्था अध्यक्ष बाळासाहेब आर.एन.शिंदे, उपाध्यक्ष दादासाहेब सुरेंद्र विनायक मराठे, स्कूल कमिटी चेअरमन सुभाष शेठ जैन, व्हा.चेअरमन डाॅ.विवेकानंद शिंदे, संचालक धनराज जैन, हिरामण गांगुर्डे, ए.बी.मराठे, प्राचार्य एम.ए.बिरारीस, उपप्राचार्या मोरे, कुलकर्णी, पर्यवेक्षक पी.एच.पाटील, जि.प.सदस्या सुधामती गांगुर्डे, पिंपळनेर ग्रामपंचायतीचे उपसंरपंच विजय गांगुर्डे यांनी तनुष्काच्या यशाचे कौतुक केले.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत तनुष्काचे यश appeared first on पुढारी.