पिंपळनेर : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून आंदोलन

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
कर्म आ. मा. पाटील कला वाणिज्य आणि कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर येथील शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रलंबित मागण्यांसाठी काळ्याफिती लावून निषेध आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या कालबद्ध पदोन्नती 12वर्ष, 24वर्ष व सुधारित कालबद्ध पदोन्नती 10, 20, 30 ची पदोन्नती कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर 2005 नंतर सेवेत असलेल्या सहकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. तसेच रिक्त जागा शासनाने ताबडतोब भराव्यात. अशा अनेक मागण्या शासन दरबारी संघटनेच्या वतीने मांडण्यात आल्या आहेत. शासनाने मागण्यांची दखल ताबडतोब घ्यावी म्हणून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन केले. या आंदोलनात महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक  किशोर विसपुते तसेच मनोज भामरे, लक्ष्मीकांत पवार, संदीप अमृतकर, मनोहर बोरसे, नरेंद्र ढोले, ताराचंद चौरे, रवींद्र शेलार, रखमाप्पा गवळी, कैलास जिरे, उर्मिला ठाकूर, भूपाल शिंदे, कुणाल कुवर या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून शासनाचा निषेध नोंदवला. कर्मचाऱ्यांच्या मागण्याची शासनाने ताबडतोब दखल घ्यावी अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास सोमवार, दि. 20 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा राज्यसेवक संयुक्त कृती समितीने दिला असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून आंदोलन appeared first on पुढारी.