बीएचआर घोटाळा प्रकरणी 22 मालमत्तांवर टाच, प्रमोद रायसोनींशी संबंधित 150 बँक खाती गोठवली

बीएचआर घोटाळा,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भाईचंंद रायसोनी पतसंस्था अर्थात बीएचआरच्या कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी संस्थेचे संस्थापक प्रमोद रायसोनींसह संस्थेच्या राज्यातील १४१ बँकांतील सुमारे १५० खाती राज्य शासनाने गोठवली. शिवाय २२ ठिकाणच्या मालमत्तांवरही टाच आणली आहे. ८१ पैकी ११ गुन्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. हा शासन निर्णय जिल्हा न्यायालयास प्राप्त झाला आहे.

पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणी राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ८१ गुन्हे दाखल आहेत. त्यातील श्रीगोंदा, तळेगाव, खेड, खडक, डेक्कन, शिलेगाव, सरकारवाडा, पिंप्री, अकलुज, इंदापूर व पाचोरा या गुन्ह्यांमध्ये शासनाने हे पाऊल उचलले. सर्व ८१ गुन्ह्यांच्या खटल्याचे कामकाज जळगाव जिल्हा न्यायालयात सुरू आहे. तत्पूर्वी राज्य शासनाच्या गृहविभागाने ४ जानेवारी रोजी शासन निर्णय घेऊन मालमत्ता जप्तीचा बडगा उगारला. बीएचआरच्या राज्यभरातील मालमत्ता, रायसोनी कुटुंबीय, त्यांच्या फर्मचे बँक खात्यांची माहिती घेण्यात आली होती.

हेही वाचा :

The post बीएचआर घोटाळा प्रकरणी 22 मालमत्तांवर टाच, प्रमोद रायसोनींशी संबंधित 150 बँक खाती गोठवली appeared first on पुढारी.