लासलगावला भीषण पाणीटंचाई, ग्रामपंचायत सदस्य करतोय गावाला टॅंकरने पाणीपुरवठा

राकेश बोरा

लासलगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसापासून लासलगाव सह परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून यामुळे लासलगावकर हतबल झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील ग्रामपंचायत सदस्य शेखर होळकर हे सामाजिक बांधिलकी म्हणून वार्डात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. दररोज साधारणता ५० हजार ते ६० हजार लिटर पाणी पुरवठा करत आहे. विशेष म्हणजे कुठलाही गाजावाजा किंवा टँकर वर स्वताचे नाव न टाकता गेल्या तीन वर्षांपासून अविरत पाणी पुरवत आहे.

लासलगाव परिसरात सोळा गाव पाणीपुरवठा योजना सततची होणारी पाइप लीकेज व वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे यामुळे धरणात मुबलक पाणी असून देखील लासलगावकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लासलगाव ग्रामपालिका सदस्य शेखर होळकर यांनी स्वतः पदरमोड करून सामाजिक बांधिलकी जपत पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले असून गेल्या तीन वर्षांपासून मोफत टँकरने पाणी पुरवठा करत आहे.

लासलगाव परिसरात सर्वत्र महिला, लहान मुले डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण करत फिरत आहे. होळकर यांचे कडून टॅंकरने पाणी पुरवठा सुरू असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत सदर टॅंकर चालू ठेवणार असल्याचे शेखर होळकर यांनी सांगितले.

धरणात मुबलक पुरेसा पाणीसाठा आहे परंतु १६ गाव पाणीपुरवठा सततच्या लिकेजमुळे लासलगावकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. सतत पाईपलाईन फुटने व वारंवार वीज पुरवठा खंडित होणे यामुळे लासलगावकरांना अभूतपूर्व पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले असून गेल्या तीन वर्षा पासून मोफत टँकरने पाणी पुरवठा करत आहे.

शेखर होळकर, ग्रामपंचायत सदस्य लासलगाव

हेही वाचा :

The post लासलगावला भीषण पाणीटंचाई, ग्रामपंचायत सदस्य करतोय गावाला टॅंकरने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.