शिवसेना वर्धापन दिन : जाखोरीत जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

जाखोरी www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

“जय भवानी.. जय शिवाजी.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.. जिंदाबाद झिंदाबाद.. शिवसेना झिंदाबाद” अशा घोषणा देत नाशिक तालुक्यातील जाखोरी गावात शिवसेनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा ज्येष्ठ शिवसैनिक. विधीवत पूजा करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच आबाल वृद्ध विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख राहुल धात्रक यांच्यासह शिवसैनिकांनी मिठाई वाटप केले.

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त प्रथम फळ शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांच्या काळातील काही किस्से आणि जुन्या आठवणी सांगितल्या आणि उद्धव ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या गद्दारांचे कधीही भले होणार नाही, उलट जनता त्यांना चांगलाच धडा शिकवेल. त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. शिवसेनेने अनेक कडू-गोड प्रसंग पाहिले असून प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहे. असे सांगून ते म्हणाले की, आपण शिवसेनाप्रमुख असताना त्या काळात गावातील एका शिवसैनिकाला पाच हजार रुपयांची मदत केली.विश्वास कळमकर, एकनाथ खाडे, मोहन खाडे, रामदास बोराडे, प्रकाश नागरे, जनार्दन नागरे, संदीप धात्रक, अशोक धात्रक, नितीन कळमकर, सोपान कळमकर, सुभाष बोराडे, सोमनाथ बोराडे, दिनेश क्षीरसागर, योगेश जाधव, अंबादास कळमकर, प्रकाश पगारे, सुरेश सोनवणे, गणेश सोनवणे, गणपत खाडे, काशिनाथ धात्रक, उष्ट्‍चिकित्सक, विष्णू जाधव, अंबादास कळमकर आदी उपस्थित होते. प्रथम शाखा प्रमुख निवृत्ती माळी यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला तर ग्रामपंचायत सदस्य राहुल धात्रक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

The post शिवसेना वर्धापन दिन : जाखोरीत जुन्या आठवणींना मिळाला उजाळा appeared first on पुढारी.