Accident : जळगावात भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले

जळगाव : समोरासमोर दुचाकीची धडक झाल्याने दुचाकीस्वार महामार्गावर कोसळले. समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दीपक सुरेश नन्नवरे (वय-20, रा. बांभोरी ता. धरणगाव) या दुचाकीस्वार तरुणाला चिरडल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील जकात नाक्याजवळ घडली. या घटनेत दीपकचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर वत्त असे की, धरणगाव तालुक्यातील दीपक नन्नवरे हा त्याचा मित्र ललित गोकुळ पाटील याच्यासोबत जळगाव शहरात आले होते. काम आटोपून दुचाकीने गावाकडे परत जाण्यासाठी निघाला. याचवेळी राष्ट्रीय महामार्गावरील जकात नाक्यासमोर समोरुन येणाऱ्या दुचाकीची आणि दीपकच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दीपक हा महामार्गावर कोसळला असता, भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दीपकला चिरडले. यात दीपक जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र ललित हा गंभीर जखमी झाला आहे. दीपकच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post Accident : जळगावात भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले appeared first on पुढारी.