AMPC Election 2023 : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार निवडणूकीत ९८.४९ % मतदान

नांदगाव www.pudhari.news

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी पंचवार्षिक निवडणुक मतदान प्रक्रिया शुक्रवार (दि. २८) रोजी येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार पडली.

१८ संचालक पदांच्या जागांसाठी ४० उमेदवार नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतून रिंगणात उतरले होते. अखेर ४० उमेदवारांचे भवितव्य आज शुक्रवार (दि. २८) मतपेटीत बंद झाले आहे. एकूण १६६६ पैकी १६४१ मतदारांनी मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजवला. सकाळी आठपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मतदानास मतदारांकडून सुरवातीला थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत होते. मात्र दुपारनंतर मतदारांकडून मतदान केंद्रावर मतदानासाठी प्रतिसाद वाढताना दिसून आला.

निवडणूकसाठी मतदानासाठी एकूण ६ बुथ उभारण्यात आले होते. तर मतदान केंद्रांच्या बाहेर दोघी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तसेच मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडण्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात होती. त्यासाठी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांच्या मार्गदर्शनातून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया आगदी शांततेत पार पडली. मतदानानंतर रविवारी, दि. ३० रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नांदगाव : येथे मतदान करण्यासाठी जात असताना ज्येष्ठ नागरिक.

● एकूण मतदार संख्या: १६६६
● झालेले मतदान : १६४१
● सोसायटी :६१४
● ग्रामपंचायत: ५६६
● व्यापारी: ३५०
● हमाल मपारी: १११
● एकूण झालेले मतदानाची टक्केवारी ९८.४८%

The post AMPC Election 2023 : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार निवडणूकीत ९८.४९ % मतदान appeared first on पुढारी.