CBSE बोर्ड परीक्षेत स्नेहा सावकार विद्यालयात प्रथम

देवळा ; सीबीएसई (CBSE)  दहावीच्या फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, यशाची परंपरा कायम राखत तालुक्यातील भावडे एसकेडी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित, एस. के.डी.इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

दहावीच्या परीक्षेत विद्यालयाची विद्यार्थिनी कु. स्नेहा अरुण सावकार हिने 95 टक्के गुण मिळून विद्यालयात प्रथम पटकविला  तर कु. वेदिका सतीश देवरे 94.2 टक्के (द्वितीय), कु. पूर्वा निंबा पगार 91टक्के (तृतीय) विद्यालयातील बाकी विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत चांगली टक्केवारी मिळवून घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक सुधीर सोनवणे, अजय बच्छाव, भाग्यश्री जाधव, अनुजा रौंदळ, नूतन सैंदाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

या परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजय देवरे , सचिव मीनादेवरे, प्राचार्य एस.एन. पाटील, बबलू देवरे, सागर कैलास आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.