Dhule : पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्यात श्रमदानातून वनराई बंधारे

वनराई बंधारे,www.pudhri.news

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील टेंभे (प्र.वार्सा) येथे ग्रामस्थ व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने सध्यस्थितीत सर्वच ओढे नाले प्रवाहित-झाले आहे. पाण्याचा हा प्रवाह पारंपारिक पद्धतीने अडवून बिगर पावसाळी हंगामातील पिकांसाठी सुरक्षित पाणी उपलब्ध होऊ शकते. पिकांच्या पाण्याची गरज काही अंशी भागवता येऊ शकते यासाठी संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून ‘लोकसहभागातून सिंचन वृद्धीची शाश्वती’ या संकल्पनेतून नाशिक विभागीयकृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी नाशिक विभागात ११ हजार ५६० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

त्यानुसार टेंभे ग्रामस्थ व कृषी विभागाचे पिंपळनेर मंडळ अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त श्रमदानातून प्रवाह पात्रातील माती वाळू, खतांच्या व सिमेंटच्या गोणी यांच्या सहाय्याने दोन वनराई बंधारे बांधण्यात आले.

याप्रसंगी पिंपळगाव (बु) ग्रामपंचायतचे माजी सरपंच आनंदा सूर्यवंशी, टेंभे ग्रामपंचायतचे सरपंच शशिकांत राऊत, उपसरपंच हिरालाल देसाई, पिंपळनेर मंडळ कृषी अधिकारी तानाजी सदगीर, कृषी पर्यवेक्षक शिवाजी राऊत, कृषी सहाय्यकसी.डी.वेंडाईत, आबाजी बहिरम, योगेश पवार, शिवाजी चौरे, सर्जेराव अकलाडे, रवींद्र साबळे, सुलभा बागुल यांच्यासह ग्रामस्थांनी श्रमदान केले. ग्रामस्थांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधण्यासाठी कृषी विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी तानाजी सदगीर यांनी केले आहे.

अडवल्या जाणाऱ्या पाण्याच्या क्षमतेनुसार रब्बी पिकांच्या त्यासाठी बंधाऱ्यात अडवलेल्या पाण्याचा विनियोग करावा असे आवाहन साक्री तालुका कृषी अधिकारी सी.एस.ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post Dhule : पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्यात श्रमदानातून वनराई बंधारे appeared first on पुढारी.