Health News : थंडीत हृदयविकाराचा धोका जास्त

Heart attack www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आरोग्य संपदेसाठी हिवाळा हा अत्यंत चांगला ऋतू मानला जात असला, तरी या काळात काहींनी काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक तसेच ज्यांना कॉलेस्टेरॉल आणि थायरॉइडचा त्रास असलेल्यांनी अधिक सतर्कता बाळगायला हवी. कारण थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्याने हृदविकाराचा धोका अधिक वाढतो, असे तज्ज्ञ सांगतात. दरवर्षी नाशिकमध्ये ज्या तीव्रतेने थंडी पडते, तेवढी थंडी अद्यापपर्यंत पडली नसली, तरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक सर्वाधिक थंड शहर म्हणून पुढे आले आहे. विशेषत: निफाड तालुक्यातील सर्वाधिक थंडीची नोंद झाली आहे. दरम्यान, अतिथंडीमुळे रक्तवाहिन्या काही प्रमाणात आकुंचन पावत असल्याने, सुरळीत रक्तपुरवठा होण्यास मोठा अडथळा निर्माण होतो. परिणामी हृदय आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याने, हृदविकाराचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण होते.

अशी घ्या काळजी…
* ज्येष्ठ नागरिक तसेच थॉयराइडचा त्रास असलेल्यांनी या काळात अतिश्रमाचे कामे टाळावीत.
* मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना, थंडीचे प्रमाण विचारात घ्यावे.
*  हिवाळ्यात थंडी, कप, छाती भरणे अशा समस्या उद्भवल्यास तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ज्या लोकांना ब्लॉकेजेसचा त्रास आहे, त्यांना थंडीत चालताना धाप लागण्याची शक्यता असते. थंडीत मॉर्निंग वॉक करताना कोणाला धाप लागत असल्यास, शरीरात काहीतरी गडबड आहे, हे समजून घ्यायला हवे. बर्‍याचदा आपल्या हृदयात ब्लॉकेजेस आहेत, ही बाब अनेकांना माहिती नसते. मात्र थंड वातावरणात चालताना धाप लागत असेल, तर तत्काळ तपासणी करायला हवी. – डॉ. सचिनकुमार पाटील, हृदयरोगतज्ज्ञ.

हेही वाचा:

The post Health News : थंडीत हृदयविकाराचा धोका जास्त appeared first on पुढारी.