Jalgaon APMC Election : जळगावात बोगस मतदानाच्या संशयातून गदारोळ

जळगाव,www.pudhari.news

जळगाव : जिल्ह्यातील १२ कृउबा समिती निवडणुकीसाठी आज (दि. २८) एप्रिल रोजी मतदान होत आहे. मात्र जळगाव शहरातील ‘नूतन मराठा’ विद्यालयातील केंद्रात बोगस मतदान होत असल्याचा संशय आल्याने गदारोळ झाला आहे.

जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव आणि भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर या १२ बाजार समितीसाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव बाजार समितीसाठी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात मतदान केंद्र आहे. याठिकाणी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास धुडकू सपकाळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या केंद्रावर बोगस मतदान होत असल्याची तक्रार केली. यावरून येथे बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी हमाल-मापारी नसलेले काही लोक मतदान करत असल्याची उघडकीस आल्याने धुडकू सपकाळे आणि त्यांचे सहकारी आक्रमक झाले.

हेही वाचा :

The post Jalgaon APMC Election : जळगावात बोगस मतदानाच्या संशयातून गदारोळ appeared first on पुढारी.