Mockdrill : नागरी संरक्षण दलामार्फत 34 जिल्ह्यांमध्ये होणार ‘मॉकड्रिल’

नागरी संरक्षण दल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत 34 जिल्ह्यांतील निवड केलेल्या 34 शाळा अथवा महाविद्यालयांमध्ये १४ डिसेंबरपर्यंत आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिलचे (Mockdrill)  आयोजन करण्यात आले आहे.

हे मॉकड्रिल महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, यूएनडीपी व राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या पुढाकाराने आणि रिका इंडिया या संस्थेच्या सहकार्याने होणार आहे.

नागरी संरक्षण दल व होमगार्ड विभागातील अधिकारी संबंधित शाळा किंवा महाविद्यालयातील शिक्षकांशी समन्वय साधून मॉकड्रिल आयोजित करणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना धोक्याची सूचना, आग विमोचन, स्थलांतर आदींची प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्तीमध्ये धैर्याने संकटावर मात कशी करावी, तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे बहुमोल व उपयोगी प्राथमिक प्रशिक्षण या मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

The post Mockdrill : नागरी संरक्षण दलामार्फत 34 जिल्ह्यांमध्ये होणार 'मॉकड्रिल' appeared first on पुढारी.