
नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा
पाथर्डी फाटा येथील प्रशांतनगरमधील एका फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे गृहोपयोगी सामान जळून खाक झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वयंपाकघरात असलेले दोन भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी (दि. ३१) दुपारी पावणेतीनच्या दरम्यान पाथर्डी फाटा येथील प्रशांतनगरमधील मनसा अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर १ मध्ये शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. याबाबत स्टेट बॅंक चौक येथील सिडको अग्निशमन दलाच्या कार्यालयात फोनवरून कळवण्यात आल्याने येथील फायरफायटर राजेश हाडस, संजय गाडेकर, चालक सुनील घुगे, रवि आमले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेत आग विझवायला सुरुवात केली. यावेळी घरात दोन भरलेली सिलिंडर असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ फ्लॅटमध्ये जाऊन येथील सिलिंडर जागेतून हलवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या आगीत किचनमधील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले; मात्र दोन बेडरूममधील सामान वाचवायला अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
हेही वाचा :
- अहमदनगर : शाळकरी मुलीची छेडछाड; आरोपीला पुण्यात अटक
- Tur Dal Rate : तूरडाळीचे दर कडाडले ! 170 चा आकडा पार; अन्य डाळीही महागल्या
- Pune Gramin Police : दुष्काळी स्थितीमुळे पुणे जिल्हा पोलीसांचे ‘टेंशन’ वाढले
The post Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक appeared first on पुढारी.