Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, तीन युवक ठार

Accident

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

मुंबई आग्रा महामार्गाजवळील इगतपुरी येथील सह्याद्रि नगर समोर मंगळवारी (दि. 10) रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे येथील तीन युवक जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीस इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई आग्रा महामार्गावरील पंढरपुरवाडी भागात मंगळवार (दि. १०)  रात्री ९ वाजेच्या सुमारास घाटनदेवी येथून बोरटेंभेकडे जाणाऱ्या टांग्याला व मोटार सायकलला एका भरघाव आयशरने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

या अपघातात बोरटेंभे येथील प्रभाकर सुधाकर आडोळे (वय २५), कुशल सुधाकर आडोळे (वय २२) व रोहित भगीरथ आडोळे (वय १९) हे जागीच ठार झाले आहेत. हे सर्वजण बोरटेंभे येथील रहिवासी असून या घटनेमुळे बोरटेंभे गावात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर आयशरचा चालक फरार झाला असून इगतपुरी पोलीस त्याचा शोध घेत आहे.

हेही वाचा :

The post Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, तीन युवक ठार appeared first on पुढारी.