
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एबीबी सर्कलजवळ नव्याने सुरू झालेल्या मुहूरत मॉलमध्ये कपडे चोरल्याचा आरोप करीत मॉलचे मालक आणि बाउन्सरने तेथील कामगारास दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामगाराच्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात रितेश जैन, विनीत राजपाल, अभिषेक सिंग यांच्यासह इतरांविरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाहुळकर (२२, रा. सातपूर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो मुहूरत मॉल येथे कामास आहे. मॉलमधील कपडे चोरीस गेल्याने कामावरील मुलांची चौकशी करण्यात आली.
त्यात शर्ट चोरल्याच्या संशयावरून विशालला मॉल मालक व बाउन्सरने दोन दिवस मॉलमध्ये डांबून बेदम मारहाण केली. मारहाणीत विशालला दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :
- Stock Market Today | जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत, सेन्सेक्स तेजीत, निफ्टी १८,२५० वर
- Nashik : शहीद जनार्दन ढोमसे यांना अखेरचा निरोप, कुटुंबीयांना अश्रू अनावर
- ऑस्ट्रेलियात सुरू झालाय युनायटेड कप टेनिसचा थरार
The post Nashik : मॉलमध्ये कपडे चोरल्याच्या संशयावरून कामगारास बाउन्सरकडून बेदम मारहाण appeared first on पुढारी.