Nashik Lasalgaon : रेल्वेने उडविल्याने चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

रेल्वेने उडविल्याने मृत्यू www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) वार्ताहर : लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन (टॉवर) चुकीच्या दिशेने आल्याने काम करत असलेल्या चार गँगमनला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत चारही गँगमचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, लासलगाव रेल्वे स्थानकावर आज (दि. १३) पहाटे 5. 44 वाजेच्या दरम्यान टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. त्याचवेळी पोल नंबर १५ ते १७ मधील ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. हे काम करित असलेल्या चारही ट्रॅक मेंटनर कर्मचा-यांना रेल्वे लाइनच्या मेटेंनेंस करणा-या टॉवरने धडक दिल्याने या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

य़ा दुर्घटनेत संतोष भाऊराव केदारे (38), दिनेश सहादु दराडे (35), कृष्णा आत्मराम अहिरे (40), संतोष सुखदेव शिरसाठ (38) या चार कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Lasalgaon : रेल्वेने उडविल्याने चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू appeared first on पुढारी.