Nashik Leopard : “त्या’ बिबट्यासाठी आता “ऑपरेशन ओपन’

बिबट्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पिंपळद (ता. त्र्यंबकेश्वर) ये‌थील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. मात्र, वनकर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना भौगोलिक परिस्थितीचा अडथळा येत आहे. पिंजऱ्यात तसेच ‘ट्रँक्युलाइज’द्वारे बिबट्या जेरबंद होत नसल्याने वनविभागाने भूमिका बदलली असून, भौगोलिक क्षेत्राच्या अभ्यासानुसार बिबट्यासाठी ‘ऑपरेशन ओपन’ राबविण्यात येत आहे. बिबट्याला मोकळ्या जागेत येण्यास प्रवृत्त करून ‘ट्रँक्युलाइज’ केले जाणार आहे.

प्रगती उर्फ देविका भाऊसाहेब सकाळे (७) या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तेव्हापासून बिबट्याच्या शोधार्थ सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्याला जेरंबद करण्यासाठी १६ पिंजऱ्यांसह २५ ट्रॅप कॅमेरे तैनात आहेत. मात्र, बिबट्या अतिशय चपळ असून, बारा दिवसांपासून वनपथकांना हुलकावणी देत आहे. बिबट्यासाठी आता तांत्रिक समितीने नवा आराखडा आखला आहे.

पुढील दोन दिवसांत बिबट्या पिंजऱ्यात अथवा ‘ट्रँक्युलाइज’ न झाल्यास शुटआउटच्या प्रस्तावाचा विचार करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पिंपळदचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ नजर ठेऊन आहे. ‘शूटआउट’चा प्रस्ताव आलेला नसून, तांत्रिक समितीच्या निर्णयानुसार नागपूर मुख्यालयाकडे शिफारस करणार असल्याचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post Nashik Leopard : "त्या' बिबट्यासाठी आता "ऑपरेशन ओपन' appeared first on पुढारी.