सिडको : पुढारी वृत्तसेवा- सिडको विभागातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे एकमेव माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांनी शुक्रवारी ( दि. २९ ) दुपारी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
राजेंद्र महाले सिडको विभागात पंधरा वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. पक्षात त्यांना पंधरा वर्षात कोणतेही महत्वाचे पद मिळाले नसल्याने ते नाराज होते. तीन वर्षा पासून त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू होती. अखेर शुक्रवारी महाले यांनी भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस माधुरी नाईक, विक्रांत पाटील, भाजपा नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सिडको विभागाचे भाजप अध्यक्ष रवी पाटील, उपाध्यक्ष शैलेश साळुंके, यशवंत नेरकर, प्रवीण सोनवणे, डी.बी राजपूत, प्रकाश चकोर आदी उपस्थित होते. महाले यांच्या भाजपा प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २४ मधील राजकारण बदलणार आहे, तर महाले यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढणार आहे.
हेही वाचा :
- RCB vs KKR : नाणेफेक जिंकत कोलकाताचा गोलंदाजीचा निर्णय
- Prakash Ambedkar : तीन दिवसांत भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी करणार : ॲड. प्रकाश आंबेडकर
- परभणी: मिरखेल- माळटेकडी लोहमार्गावर विद्युत रेल्वेची चाचणी यशस्वी
The post Nashik News | माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांचा भाजपात प्रवेश appeared first on पुढारी.