वणी : पुढारी वृत्तसेवा – वणी बसस्थानकात उभी असलेल्या बसच्या इंजिनने अचानक पेट घेतल्याने बस मधील २७ प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवून आग विझवण्यात आली.
दि. २२ मे रोजी वणी बसस्थानकात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नाशिकहुन कळवणकडे जाणारी एसटी महामंडळाची पिंपळगाव डेपोची जादा बस क्रमांक एम एच १४ बी टी ३७६१ वणी बस स्थानकात उभी असतांना बसच्या इंजिनला अचानक आग लागली. बस चालक बाबाजी लक्ष्मण गवळी यांनी प्रसंगावधान राखत बसचा स्वीच बंद केला बस वाहक ज्योती नाडे यांनी बस मध्ये असलेल्या प्रवाश्यांना खाली उतरविले. त्याच दरम्यान बसला इंजिनाच्या खालच्या बाजुने मोठ्याप्रमाणात धुर येऊन इंजीन ने पेट घेतला
बस मधील फायर सेफ्टी सिलेंडर अकार्यक्षम असल्याने चालुच झाले नाही. गाडीचा गिअर सटकुन गाडी न्युट्रल होत मागे जाऊ लागली. त्यावेळी गाडी पुर्ण रिकामी होती व गाडीमागे प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. त्यावेळी या ठिकाणी उपस्थित तुषार शर्मा, वर्तमान पत्र विक्रेते सुनिल महाले, वणी बस स्थानकातील वाहतुक नियंत्रक के के चौरे व चालक गवळी यांसह उपस्थित प्रवासी व स्थानिक नागरींकानी प्रसंगावधाव राखत गाडीच्या चाकाखाली मोठे दगड टाकुन गाडी थांबवली. बस मध्ये चालकाने ठेवलेल्या पाण्याची कॅनने पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केले परंतु आग विझली नाही. बसस्थानकात असलेल्या प्रवाश्यांनी धाव घेऊन वाळु माती पाणी टाकुन आग विझवली. तर बस चालकाचे सीट व डॅश बोर्ड चा भाग जळुन खाक झाले. या बस मध्ये २७ प्रवाशी होते. सुदैवाने यात कोणीच जखमी झाले नाही. बसचे नुकसान झाले. या बाबत माहिती बस चालक यांनी दिली.
हेही वाचा –