Nashik Sinner Accident : आतापर्यंत 10 पैकी 7 मृतांची ओळख पटली

नाशिक सिन्नर शिर्डी अपघात

नाशिक, (सिन्नर) :

सिन्नर शिर्डी महामार्गावर आज (दि.13) पाथरे गावाजजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत त्यातील सात मृतांची ओळख पटली आहे. या अपघातात 17 जण जखमी असून त्यांच्यावर सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या सात मृतांची ओळख पटली

१) प्रमिला प्रकाश गोंधळी,वय-४५,
२) वैशाली नरेश उबाळे, वय ३२,
३) श्रावणी सुहास बारस्कर,वय ३०,
४) श्रध्दा सुहास बारस्कर, वय-४
५) नरेश मनोहर उबाळे,वय-३८ या सर्व रा.अंबरनाथ
६) बालाजी कृष्णा मोहंती, वय-२५(ड्रायव्हर)
७)दिक्षा संतोष गोंधळी, वय-१८ रा.कल्याण

पालकमंत्री दादा भुसे हे सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत.

 

The post Nashik Sinner Accident : आतापर्यंत 10 पैकी 7 मृतांची ओळख पटली appeared first on पुढारी.