नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा – शासनाचे आदेश

रेशन कार्ड www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना वर्षभर मोफत रेशन वितरित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. चालू महिन्यापासून आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यातील 36 लाख 22 हजार 110 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.

स्वस्त धान्य वितरण योजनेद्वारे अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांना महिन्याकाठी रेशन दुकानांमधून नियमित धान्याचे वितरण केले जाते. त्यामध्ये तीन रुपये प्रतिकिलो तांदूळ व दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू उपलब्ध करून देण्यात येतो. देशभरातील कोट्यवधी लाभार्थी या धान्याचा लाभ घेतात. दरम्यान, कोरोनाच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून तब्बल दीड वर्ष मोफत धान्य वितरित करण्यात आले. परिणामी कोरोनाच्या संकटात नियमितसह मोफतच्या धान्यामुळे गोरगरीब जनतेला आधार मिळाला. गेल्या वर्षी देशभरातील काही भागांत अधिक पाऊस व काही राज्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने धान्याचे उत्पादन कमी झाले. त्यातच मोफतच्या धान्याला डिसेंबरअखेरपर्यंत मुदत असल्याने देशभरातून त्याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. एकूण नाराजीचा सूर बघता केंद्राने मोफतचे धान्य देणे बंद करताना 2023 मध्ये संपूर्ण वर्षभर नियमितचे धान्य मोफत देण्याचा निर्णय डिसेंबरमध्ये घोषित केला. मात्र, त्याचे आदेशच स्थानिक स्तरावर न पोहोचल्याने योजनेच्या अंमलबजावणीवरून प्रशासनात साशंकता होती. अखेर पुरवठा विभागाला मोफत धान्य वितरणाबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर या काळात लाभार्थींना मोफत धान्य वितरण केले जाणार असून, चालू महिन्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल.

नव्या ठेवींचे प्रमाण 47.1 टक्क्यांनी घटले
अंत्योदय, प्राधान्य रेशनकार्ड : 7,95,078
एकूण लाभार्थी संख्या : 36,22,110
धान्य घेताना पावतीची मागणी करावी.
तक्रारीबाबत पुरवठा विभाग किंवा तहसीलशी संपर्क साधावा.

हेही वाचा:

The post नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा - शासनाचे आदेश appeared first on पुढारी.