अपघाती मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा

नाशिक : रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार झाल्याची घटना धात्रक फाटा येथे २१ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात एमएच १५ एफयु ८३११ क्रमांकाच्या रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृषाली किशोर साेनवणे (रा. धात्रक फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित रिक्षाचालकाने दुचाकीस धडक दिल्याने आत्माराम विश्वनाथ खरात (७०, रा. धात्रक फाटा) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

अशोक नगरला भरदिवसा घरफोडी

नाशिक : सातपूर येथील अशोक नगर परिसरातील स्वामी विवेकानंद नगर भागात चाेरट्याने भरदिवसा घरफोडी करून ९१ हजार रुपयांचा एेवज लंपास केला. मनोजभिकनराव खरोटे (४५) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने बुधवारी (दि.५) सकाळी आठ ते सायंकाळी ५.३० या वेळेत घरफोडी करून ३१ हजार रुपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा एेवज लंपास केला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगुरला दोघींचा विनयभंग

नाशिक : भगूर परिसरात दोन बहिणींचा विनयभंग करीत त्यांना जातीवाचक अपशब्द वापरल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तिघांविरोधात विनयभंगासह अॅक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित हरीष कातकाडे (३३), अविनाश कातकाडे (६०) व निखील कातकाडे (३०, सर्व रा.भगुर) यांनी बुधवारी (दि.५) रात्री दहाच्या सुमारास दोघींचा विनयभंग करीत अपशब्द वापरले.याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी हे तपास करीत आहेत.

हेही वाचा –