आयमा निवडणुकीत एकता पॅनल २५ जागांवर विजयी

आयमा निवडणूक,www.pudhari.news

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा- उद्योजकांची संघटना असलेल्या आयमा कार्यकारिणी सदस्याच्या २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकता पॅनलचे सर्वच २५ उमेदवार निवडून आले. तर अपक्ष उमेदवार अनिल आमले याला फक्त १६४ मते मिळाली. आयमाची गुरुवारी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. दरम्यान तीन तासात मतमोजणी संपली. तर, यापूर्वी अध्यक्ष पदासाठी ललीत बुब, उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र पानसरे, जनरल सेक्रेटरी पदासाठी प्रमोद वाघ, खजिनदार पदासाठी गोविंद झा., सचिव पदासाठी हर्षद बेळे व योगिता आहेर हे बिनविरोध निवडून आले आहेत. (Nashik AIMA Election)

आयमा निवडणुकीत ३१ जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यात सहा पदाधिकारी बिनविरोध निवडून आले तर २५ जागांसाठी २६ उमेदवार असल्याने मंगळवारी मतदान झाले. यात एकुण २१४६ मतदार पैकी ८९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ४१ . ८४ टक्के मतदान झाले. आयमा सभागृत येथे बुधवारी सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.  तीन तासात मतमोजणी पार पडली. यात एकता पॅनलचे अभिषेक व्यास, अजय यादव, करणसिंग पाटील, अविनाश बोडके, अविनाश मराठे, देवेंद्र विभूते, दिलीप वाघ, हेमंत खोंड, जगदीश पाटील, जयदीप अलिमचंदानी, जयंत पगार, जितेद्र आहेर, कुंदन डरांगे, मनिष रावल, विराज गडकरी, श्रीलाल पांडे, राहुल गांगुर्डे, धिरज वडनेरे, रवि महादेवकर, रवी शामदान्सी, रविंद्र झोपे, विनोद कुंभार, सुमित बजाज, उमेश कोठावदे, श्वेता चांडक निवडून आले. तर अपक्ष उमेदवार अनिल आमले यांना फक्त १६५ मते मिळाली. तर मतपत्रिकेवर २६ उमेदवारांपुढे मतदान झालेले एकुण १५ मते बाद झाली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी विवेक गोगटे, सहायक निवडणुक अधिकारी सतीश कोठारी, एन .टी गाजरे यांनी दिली. (Nashik AIMA Election)

यापूर्वी अध्यक्ष पदासाठी ललीत बुब, उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र पानसरे, जनरल सेक्रेटरी पदासाठी प्रमोद वाघ, खजिनदार पदासाठी गोविंद झा, सचिव पदासाठी हर्षद बेळे व योगिता आहेर हे बिनविरोध निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांचे एकता पॅनलचे नेते धनंजय बेळे, आयमाचे माजी अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष निखिल पांचाल सह पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

The post आयमा निवडणुकीत एकता पॅनल २५ जागांवर विजयी appeared first on पुढारी.