नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि.१०) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बसस्थानकासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा हा नाशिक दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नाशिकमध्ये दुपारी १.५५ ओझर विमानतळावर आगमन होईल. दुपारी २.३० वाजता पंचवटीतील हिरावाडी परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. सदाशिव गंगाराम भोरे कलामंदिराचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता कॉलेजरोडवरील गुरूदक्षिणा हॉलमध्ये स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार व जलजीवन मिशनतर्फे आयोजित जलरथाचे उद्घाटन करतील. दुपारी ४.३० वाजता महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या मैदानावर आयोजित ३४व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०२४चा समारोप फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमानंतर सायंकाळी ६.३० वाजता सातपूर पोलिस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाईल. सायंकाळी ७ वाजता मेळा बसस्थानक व शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करतील. मेळा बसस्थानकात फडणवीस यांच्या सभेचेदेखील आयोजन केले आहे. या कार्यक्रमानंतर ते आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस या दौऱ्यात काय बोलतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
- Sameer Wankhede | समीर वानखेडेंची मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी, ‘ईडी’कडून गुन्हा दाखल
- Salaam-Eagle-TBMAUJ : ईगलने ‘लाल सलाम’ला टाकले मागे, जाणून घ्या कलेक्शन
- नवाझ शरीफ कमी बुद्धीचे नेते; इम्रान खान यांचे निकालावर AI ‘विजयी भाषण’
The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात appeared first on पुढारी.