सप्तशृंगीगड पुढारी वृत्तसेवा – कळवण येथे महाशिवरात्री व भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त येथील बसस्थानक येथे आदिवासी एकलव्य भिल्ल महाविकास मंच तर्फे संपुर्ण कळवण तालुक्यात भव्य अशी भगवान एक वीर एकलव्य यांच्या मूर्तीची मिरवणूक ढोल, ताशे व बेंजो पारंपरिक वाघांच्या तालावर नाचत संपूर्ण कळवण शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
येथील रामनगर येथे आरती करून मूर्ती पूजन करण्यात आले. महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. यावेळी कळवणचे आमदार नितीन पवार, कळवण नगराध्यक्ष कैतिक पगार यांनी आदिवासी क्रांतीकारी वीर एकलव्य यांचे पुजन केले व महाशिवरात्री निमित्त फराळाचे वाटप केले. मूर्ती पूजन व भूमिपूजन कार्यक्रमासाठी आयोजन, आदिवासी एकलव्य भिल्ल महाविकास मंचाचे कळवण संस्थापक तुषार बर्डे, प्रदेश अध्यक्ष बापु बर्डे, प्रदेश संघटक दत्तु बर्डे, प्रदेश उपाध्यक्ष सरपंच प्रकाश पवार, के.के गांगुर्डे, महासचिव पी.पी पवार, जिल्हा अध्यक्ष पाडु निकम, कळवण तालुका अध्यक्ष भारत पवार, कळवण खुर्द चे सरपंच लक्ष्मण पवार, भाऊसाहेब माळी, सोमनाथ चैरे, भगवान बागुल, सुभाष खैरनार आदींसह संपूर्ण समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचा आदिवासी एकलव्य भिल्ल महाविकास मंचाचे तर्फे सत्कार करण्यात आला. नारळ फोडण्यात आले. आदिवासी एकलव्य भिल्ल महाविकास तर्फे समाजाच्या अडचणी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन कार्यक्रम मोठ्या संख्येने सहभागी होऊन साजरा करण्यात आला.
The post कळवण तालुक्यात एकलव्य जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक appeared first on पुढारी.