नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या (Maharashtra Labor Welfare Board) ६९व्या राज्यस्तरीय अंतिम नाट्य स्पर्धेला गुरुवारी (दि. ८) सुरुवात होत आहे. दि. ८ ते २५ फेब्रुवारी दररोज सायंकाळी ७ वाजता परशुराम साइखेडकर नाट्यगृहात नॉनस्टॉप नाटकांची बुलेटट्रेन रसिकांना विनामूल्य अनुभवायला मिळणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. ८) सायंकाळी ६ वाजता होणार असून उद्घाटक म्हणून आ. देवयानी फरांदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाट्यलेखक दत्ता पाटील, कामगार उपायुक्त विकास माळी, नीलय इंडस्ट्रीचे संचालक दिलीप गिरासे, राज्य कामगार संघाचे अध्यक्ष विक्रम नागरे उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra Labor Welfare Board)
स्पर्धेचे वेळापत्रक असे…
(दि. ८) सोशल किडा, (दि. ९) मुंबई मान्सून, (दि. १०) धर्मदंड, (दि. ११) ती मी आणि तो, (दि. १२) हम दो छे, (दि. १३) प्रथम पुरुष, (दि. १४) अशी पाखरे येती, (दि. १५) गंमत असते नात्याची, (दि. १६) कृष्ण विवर, (दि. १७) इथर, (दि. १८) गटार, (दि. १९) करार, (दि. २०) एक शून्य बाजीराव, (दि. २१) सती, (दि. २२) पूर्णविराम, (दि. २३) विठाईच्या काठी, (दि. २४) अनपेक्षित, (दि. २५) अजूनही चांदरात आहे
हेही वाचा:
- प्रतिभाताई पाटील यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार; श्री श्री रविशंकर करणार सन्मानित
- गीताभक्ती अमृत महोत्सवापासून नास्तिकही दूर राहू शकणार नाहीत : श्री श्री रविशंकर
- मोहोळच्या खुनातील आरोपींना मानकरने सिम कार्डसोबत कॅशच दिल्याचे निष्पन्न
The post कामगार कल्याण मंडळाच्या ६९ व्या राज्यस्तरीय स्पर्धेला सुरुवात appeared first on पुढारी.