शिंदवड,(नाशिक) – जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव यांच्या मार्फत वडगाव अहमदाबाद, गुजरात येथे होणाऱ्या सात दिवशीय कार्यशाळेसाठी नवोदय विद्यालयाने घेतलेल्या चित्रकला परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय खेडगावची समीक्षा ज्ञानेश्वर गाडे इयत्ता नववीची विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. गुजरात येथे होणाऱ्या २०४७ चा भारत कसा असेल या उद्देशाने घेतलेल्या कार्यशाळेसाठी नाशिक जिल्ह्यातून खेडगाव विद्यालयाची समीक्षा नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
समीक्षाला खेडगाव विद्यालयाचे चित्रकला शिक्षिका सविता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. समीक्षा चे, म वि प्र चे दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव तसेच माजी संचालक दत्तात्रय पाटील, विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष राजेंद्र पाटील ढोकरे, मुख्याध्यापक सुनील सातपुते, उप मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, पर्यवेक्षिका कल्पना शिंदे तसेच शालेय समितीचे बाबुराव डोखळे, जयराम पाटील, सोमनाथ ठुबे, संजय डोखळे, सुरेश डोखळे व विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक लवांड पी. डी. सर, सोनवणे एस एन. सर, खैरनार बी. व्ही , कुंदे.बी. आर. श्रीमती देवरे. के एस मॅडम, रामभाऊ पवार, भाऊसाहेब आदींचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेसाठी निवड झाल्याबद्दल समीक्षा गाडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
हेही वाचा :
- Pariksha Pe Charcha 2024 : Reels पाहू नका…! पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’, दिले ‘हे’ १० कानमंत्र
- कोण आहे Shamar Joseph? ज्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची केली दांडी गुल!
- Cyber Fraud : ऑनलाइन टास्क देऊन 37 लाखांची फसवणूक
The post कार्यशाळेच्या चित्रकला परिक्षेत जिल्ह्यातून समीक्षा गाडेची निवड appeared first on पुढारी.