खुंटेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय भामरे बिनविरोध

देवळा ; तालुक्यातील खुंटेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी संजय जिभाऊ भामरे यांची मंगळवार (दि. ३०) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच राजीव पगार यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी नवीन उपसरपंच निवडीसाठी मंगळवार दि. ३० रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ठगूबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी सर्वानुमते संजय भामरे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळू पवार, मीना निकम, भाऊसाहेब जाधव, वैशाली जाधव, भारती भामरे, सुनिता गांगुर्डे यांच्यासह ग्रामसेविका पूनम सोजने उपस्थित होत्या. याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच संजय भामरे यांचे माजी सरपंच व देवळा बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब पगार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भामरे यांचे सेवा निवृत्त सपोनि प्रल्हाद भामरे, तंटा मुक्तीचे अध्यक्ष डॉ. निंबा भामरे, विकास सोसायटीचे माजी संचालक दिलीप भामरे, माजी सैनिक रमेश आहेर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश भामरे, प्रकाश पगार, हिरामण सावकार, राजेंद्र रौंदळ, पोपट भामरे, जिभाऊ आहेर, प्रकाश मुसळे, निवृत्ती थोरात, नारायण थोरात, भाऊसाहेब भामरे, सुभाष पगार, सतीश पाटील, उद्धव भामरे आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

The post खुंटेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय भामरे बिनविरोध appeared first on पुढारी.