नाशिकची सायली वाणी टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी मुकुटाने सन्मानित 

सायली वाणी pudhari.news
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स या प्रतिष्ठित राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकची सायली वाणी हिने मुलींच्या एकेरीचे तर पुण्याची पृथा वर्टीकर हिच्या साथीने दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट मिळवून दोन सुवर्ण पदक पटकावले.
मुलींच्या एकेरीत सायली वाणी हीने अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उपांत्य फेरीत पृथा हीचा ११-५, ११-७, ११-७, ११-८ असा सहज ४-० ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर अंतिम फेरीत वेस्ट बंगालच्या नंदिनी साहा हीच्या साेबतच्या अटीतटीच्या सामन्यात सायली वाणी हीने ४-३ असा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावत मुलींच्या गटाचे विजेतेपद नावे केले. पहिले तीन गेम गमावल्यावरही सायलीने कुठलेही दडपण येऊ न देता चौथा गेम ११-८ जिंकून सामन्यातील आव्हान टीकवत वाटचाल चालू ठेवलीं. सायली वाणीने खेळातील संपूर्ण कौशल्य पणाला लावून सामन्यावर नियंत्रण कायम ठेवत नंदिनी साहा बरोबर पुढील दोन गेम ११-६, ११-९ जिंकून सामन्यात ३-३ अशी बरोबरी करत सायलीने परत पुनरागमन (कमबॅक) केले. अंतिम गेममधे सायली ३-६ पिछाडीवर असतांना नंदिनी साहाच्या केलेल्या चुकांचा फायदा उचलत पुढील सलग आठ गुण मिळवत निर्णायक गेम ११-६ असा जिंकून सुवर्ण पदक पटकावले. .
सायली वाणी हिच्या यशाबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, संजय वसंत, सतीश पटेल, अलका कुलकर्णी, अलीअसगर आदमजी, संजय मोडक, वंदना कोटेचा, जय मोडक, महेंद्र चिपळूणकर, प्रकाश जसाणी, संजय कडू, कुलजितसिंग दरोगा, भैया गरुड, सुहास आगरकर, नीता फडके, विकास कसबे आदींनी कौतुकाचा वर्षाव केला.

The post नाशिकची सायली वाणी टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी मुकुटाने सन्मानित  appeared first on पुढारी.