गुजरातच्या भाविकांच्या बसला त्रंबकेश्वरमधील खरपडी घाटात अपघात

नाशिक : कच्छचे ५७ भाविक त्र्यंबकेश्वर येथील दर्शन घेऊन गुजरातला परतत असताना खरपडी घाटात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे ३० भाविक जखमी झाले आहे.

गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इतरांवर हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नाशिकसह जिल्हाभरात अपघाताचे सत्र सुरुच आहे. काल दुपारी त्रंबकेश्वर येथील दर्शन घेऊन सर्व बसेस परतीच्या मार्गावर गुजरातकडे निघाल्या होत्या. वाटेत खरपडी गावाजवळ घाट ओलांडत असताना चालकाचे बसवरील नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात तब्बल 30 हुन अधिक भाविक जखमी झाले. त्यांना तातडीने हरसूल येथील ग्रामीण व नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हेह वाचा : 

The post गुजरातच्या भाविकांच्या बसला त्रंबकेश्वरमधील खरपडी घाटात अपघात appeared first on पुढारी.