गोळीबारातील संशयिताच्या घरात सापडले रिव्हॉल्वर, तलवार व कोयता

Firing

सिडको(नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दुचाकीला कट मारण्याच्या कारणावरून दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयित दर्शन दोंदे यांच्या घरून दोन गावठी रिव्हाल्व्हर जप्त करण्यात आले. तसेच तलवार, कोयता, चॉपर जप्त करण्यात आले आहे.

सिडकोतील जुना अंबड लिंकरोड. अभ्युदय बॅकेजवळ त्रिमुर्ती चौक जवळ रविवारी रात्री दुचाकीला कट मारण्याच्या कारणा वरून वैभव शिर्के याच्या वर संशयित दर्शन दोंदे याने गोळीबार केला होता. तर संशयित गणेश खांदवे यांनी गावठी रिव्हाल्वर मधुन गोळी मारण्याचा प्रयत्न केला परंतू त्याचे कडील पिस्तुल मधून गोळ्या जमिनीवर पडल्याने जीव वाचला तर इतर संशयित आरोपी यांनी चॉपर, तलवार व कोयता याचा वापर केल्याने परिसरात नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. अंबड पोलिसांनी रात्रीत सहाही आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी संशयित दर्शन दोंदे यांच्या कामटवाडे येथील घरातून दोन गावठी रिव्हाल्व्हर जप्त केले. तसेच तलवार , कोयता व चॉपर जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.

हेही वाचा –

The post गोळीबारातील संशयिताच्या घरात सापडले रिव्हॉल्वर, तलवार व कोयता appeared first on पुढारी.