जळगाव : पुढारी वृत्तसेवा – कर्ज वसुली करून मोटारसायकलने निघालेल्या तरूणाला रस्त्यावर आडवत चाकूचा धाक दाखवत त्याच्याजवळील ६० हजारांची रोकड हिसकावून घेतली. एवढेच नाही तर मिरचीची पुड तरूणावर फेकून मारहाण करून दोघजण फरार झाल्याची घटना १० मे रोजी दुपारी १ वाजता नेरी-दिगर रोडवर घडली होती. या गुन्ह्यातील दोन जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर हिरासिंग चव्हाण वय २५ रा. गोंदेगाव ता.जामनेर हा तरूण आयडीएफसी बँकेच्या कर्ज वसूली विभागात नोकरी करत आहे. दरम्यान, शुक्रवारी १० मे रोजी सागर चव्हाण यांनी कर्जवसुलीसाठी जामनेर तालुक्यात गेले होते. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास ते नेरी-दिगर रस्त्याने मोटारसायकलने जाण्यासाठी निघाले. त्यावेळी दोन जणांनी त्यांचा रस्ता आडविला. एकाने चाकूचा धाक दाखवत वसुलीचे पैसे ठेवलेली बॅग मागितली. बॅग दे नाहीतर तुला चाकू घालून देईल असे बोलून डोक्यात मिरचीची पुड फेकून दिली. व मारहाण करत हातातील बॅग जबरी हिसकावून पसार झाले. ही घटना घडल्यानंतर सागर याने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत सशंयित आरोपी रोहित संजय लोखंड वय २२ रा. समता नगर, जळगाव यांच्यासह एकाला पोलीसांनी रात्री १० वाजता अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहे.
हेही वाचा –