नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भुजबळांच्या नाशिक येथील कार्यालयात अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून त्यांना मारण्याची सुपारी घेतल्याचे म्हटले आहे. या धमकी पत्रानंतर भुजबळ यांच्या निवास्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
या धमकीनंतर मंत्री भुजबळांची सुरक्षा वाढविण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. भुजबळांना अशाच प्रकारे धमकीचे फोन व मॅसेज याधीही येऊन गेले आहेत. मात्र मंत्री छगन भुजबळ हे सध्या राज्यात चर्चेत आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध असल्याने, मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशात भुजबळांना पुन्हा धमकी आल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे.
साहेब सावध राहा, 5 जण तुमचा शोध घेत आहेत…
साहेब तुम्हाला उडविण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर दिंडोरी -चांदशी इशे हॉटेलमध्ये थांबले आहे. या लोकांनी तुम्हाला उडवण्याची 50 लाखांची सुपारी घेतली आहे. या गुंडांपासून सावध रहा, हे 5 जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत. सागर हॉटेलसमोर यांची मीटिंग झाली आहे. साहेब सावध राहा असे या पत्रात लिहले असल्याची माहिती मिळत आहे.
The post छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी appeared first on पुढारी.