जरांगे पाटील सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेणार

जरांगे-पाटील

Manoj Jarange, Nashik : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिकच्या दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगावचा दौरा करणार असून आज ते भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले आहेत. जरांगे यांचे शहरात मराठा समाजाकडून ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. बालेकिल्ला हा कुणाचा नसून तो फक्त जनतेचा बालेकिल्ला असतो. असा शाब्दीक टोला त्यांनी भुजबळ यांना यावेळी दिला. तसेच राजकारणासाठी गोरगरिबांचं वाटोळं करु नका, अशी जरांगे यांनी भुजबळांवर टीका देखील यावेळी केली.

अधिसूचनेचे कायद्यात रुपातंर करावे तसेच सगेसोयरे यांचा कायदा देखील व्हावा. ज्यांच्या नोंदणी नाही त्यांच्यासाठी हा कायदा व्हावा. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे. सगेसाेयऱ्यांची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी आता 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी  सांगितले आहे. विनंती करून दमलो आता आमच्या मागण्या अजूनही पूर्ण न झाल्यामुळे हे उपोषण केले जात आहे. अन्नात माती कालवण्याची भुजबळ यांची सवय असल्याचे जरांगे यांन सांगितले.

The post जरांगे पाटील सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेणार appeared first on पुढारी.