जानोरीत बिबट्याचा वासरावर हल्ला

बिबट्याचे दर्शन www.pudhari.news

जानोरी : येथील मोहाडी रस्त्यालगत बिबट्याने वासरावर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डी वाय चारीलगत अरुण ज्ञानदेव घुमरे यांचे शेतात घर आहे. रात्रीच्या सुमारास त्यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. इतर जनावरांनी हंबरडा फोडण्यास सुरुवात केल्याने घुमरे हे घराबाहेर आले, तर त्यांना बिबट्याने वासरावर हल्ला केल्याचे दिसले. त्यांनी हातात बांबू घेऊन बिबट्याला पळवून लावले. त्यामुळे वासराचा जीव वाचला, परंतु  वासरु गंभीररीत्या जखमी आहे.

आठ दिवसांपूर्वी जानोरी येथील तीन ते चार शेतकऱ्यांचे कुत्रे बिबट्याने फस्त केले होते. त्यामुळे वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मी स्वतः वन कर्मचारी दळवी यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली असता वासराचा मृत्यू होईल, त्यावेळेस आम्ही पंचनामा करण्यासाठी येऊ, असे सांगितले. ही कोणती पद्धत आहे. – अरुण घुमरे, शेतकरी

हेही वाचा :

The post जानोरीत बिबट्याचा वासरावर हल्ला appeared first on पुढारी.