नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालकक्षात रुग्णाच्या नातलगांनी तोडफोड केल्याची घटना सोमवारी (दि.५) रात्री घडली. सिडको परिसरातील दोन वर्षीय मुलास श्वानाने चावा घेतला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तेथे व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने नातलगांनी जिल्हा रुग्णालयात चौकशी केली. त्यावेळी संतप्त नातलगांनी रुग्णालयात तोडफोड केली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षीय मुलास श्वानाने १४ जानेवारीस चावा घेतला होता. गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मुलाची प्रकृती उपचारादरम्यान गंभीर झाली. त्यास व्हेंटीलेटरची आवश्यकता भासली. मात्र खासगी रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने नातलगांनी जिल्हा रुग्णालयातील बाल कक्षात चौकशी केली. तेथे संतापाच्या भरात त्यांनी काच फाेडली. दरम्यान, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या नातलगांनी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
- Sonia Gandhi : सोनिया गांधींना तेलंगणातून ‘लोकसभा’ लढवणार?
- Jalgaon News : गोर सेनेचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको; आंदोलकांकडून कारची तोडफोड
- Balkumar Sahitya Sammelan: मानवत येथे विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
The post जिल्हा रुग्णालयातील बाल कक्षात तोडफोड appeared first on पुढारी.