डिजिटल स्कील रिपोर्ट २०२४ : रोजगार संधी दुप्पट होतील

सायबर सिक्युरिटी www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
जागतिक पातळीवरील अनिश्चित वातावरणातही देशातील तंत्र उद्योग प्रगती करेल, असे दिसून येत आहे. सायबर सिक्युरिटी आणि डेटा विश्लेषणातील रोजगार संधी दुप्पट होतील, असे डिजिटल स्कील रिपोर्ट २०२४ मधून समोर आले आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातात करण्यात आलेल्या अभ्यासातून आयटीतील भरतीबाबतचे आशादायी चित्र समोर आले आहे. गेले काही महिने आयटीतील नवोदितांना असलेली संधी कमी होत आहे. उलट आयटीतील मनुष्यबळात घट झाली आहे. बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मागणी वाढल्याने रोजगार संधी निर्माण होत आहेत. आयटी उद्योगासमोरील आव्हाने कायम असली, तरी भारतीय आयटी उद्योग नवकल्पनांमुळे आणि सुसंगत धोरणांमुळे त्यावर मात करेल, असे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

आयटीतील ६६ टक्के रोजगार संधी विकास, टेस्टिंग, डिझाईन आणि अभियांत्रिकी, नेटवर्किंगमध्ये असतील. याशिवाय क्लाऊड (१६ टक्के), सायबर सिक्युरिटी (२१५) आणि विश्लेषण (२५६) या क्षेत्रातील संधीत मोठी वाढ होईल. याशिवाय बँकिंग, विमा आणि सेवा क्षेत्रातील रोजगारांत १९ टक्क्यांनी वाढ होईल. सल्लागार आणि उत्पादन विकास क्षेत्रात अनुक्रमे १५ आणि ९ टक्क्यांनी वाढ होईल. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमुळेही तंत्रज्ञांना संधी वाढतील. ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये माहितीचे विश्लेषण करणे, एआय आणि डिजिटल मार्केटिंगच्या संधी निर्माण होत आहेत.

बेंगळुरू, हैदराबादची आघाडी…
तंत्र उद्योगासाठी गुंतवणूकदारांकडून बेंगळुरू, नवी दिल्ली आणि हैदराबादची निवड केली जात आहे. या तीन शहरांत ६५ टक्के उद्योग एकवटला आहे. तर, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये अहमदाबाद, चंडीगड, इंदोर आणि जयपूरला पसंती मिळत आहे. कार्यालयीन जागांच्या भाडेकरारावरून ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: