
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. भाताच्या आवण्यांच्या कामांना नुकताच प्रारंभ झाला होता. मात्र, सततच्या पावसाने भात आवणीत पाणी तुंबल्याने आवणीची कामे खोळंबली आहेत. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांना पूर आला आहे.
दोन गावांमध्ये असलेल्या लहान पुलावर पाणी आल्याने काही वेळ दोन्ही गावांमध्ये संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. पिंपळद येथील धुमोडीला जोडणाऱ्या किकवी पुलावर पाणी आले. नाशिक आणि त्र्यंबक पेगलवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावर पाणी आले होते. दोन्ही ठिकाणी पाणी ओसरल्याने परिस्थिती सामान्य आहे. दरम्यान, हरसूल भागात पावसाचा जोर अधिक आहे. किकवी नदीला पूर असल्याने गंगापूर धरणाची पातळी झपाट्याने वाढते आहे.
हेही वाचा :
- ठाणे : वाहतूक पोलिसांनी मानसिक छळ केल्याचा मेसेज करून तरूणाने जीवन संपवले
- बारामती येथे रविवारी ऐतिहासिक कार्यक्रमात उलगडणार सगर राजपूत समाजाची यशोगाथा
- जागतिक व्याघ्र दिन विशेष : आशिया खंडातील सर्वात ताकदवान वाघ ‘वाघडोह’
The post त्र्यंबकेश्वरला नद्यांना पूर, आवण्या थांबल्या appeared first on पुढारी.