दरेगाव शिवारात अपघात ; दुचाकीस्वार ठार

Accident

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– तालुक्यातील दरेगाव शिवारातील कोकणखेडे रोडवर भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दगडाच्या गंजावर पडल्याने झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चांदवड पोलिसांत सोमनाथ बबन गांगुर्डे (४३, रा. दरेगाव) यांनी फिर्याद दिल्याने अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरेगाव येथील भगवान मुरलीधर सोनवणे (५०) हे दुगावकडून दरेगावकडे दुचाकीने (एमएच ४१, एच ९९१३) कोकणकडे जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाच्या गंजावर दुचाकी आदळल्याने, सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस हवालदार भाऊसाहेब सांगळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

हेही वाचा :

The post दरेगाव शिवारात अपघात ; दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.